बातम्या

विद्यार्थ्यांच्या मानवी रांगोळीची नॅशनल रेकॉर्डमध्ये नोंद

Human rangoli of students recorded in National Record


By nisha patil - 3/20/2024 4:35:11 PM
Share This News:



लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानामधील स्वीप अंतर्गत कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर दहा हजार ४९५ विद्यार्थ्यांनी विक्रमी अशी मानवी रांगोळी साकारून मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला. यावेळी शहरातील ३८ हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवून जिल्हयाला राष्ट्रीय स्तरावरील नवीन विक्रम नोंदविण्यात मोलाची भर घातली.   ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचा “नॅशनल रेकॉर्ड” व “एशिया पॅसिफीक रेकॉर्ड” ची नोंद झाली. यावेळी मिळालेला सन्मान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व शिक्षकांना समर्पित केला. यावेळी ते म्हणाले, देशस्तरावर नोंद झालेल्या या उपक्रमातून मतदारांना चांगला संदेश जाईल, यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास भर पडेल. या उपक्रमाला मनपा आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरीक्त मनपा आयुक्त केशव जाधव, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी स्वीप नीलकंठ करे, ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचे निरीक्षक डॉ.महेश कदम, सहायक नोडल वर्षा परिट, श्री.धायगुडे उपस्थित होते.


विद्यार्थ्यांच्या मानवी रांगोळीची नॅशनल रेकॉर्डमध्ये नोंद