बातम्या
मी ही हातकणंगले मतदारसंघातून ईच्छुक : डॉ. संजय पाटील
By nisha patil - 3/28/2024 5:43:23 PM
Share This News:
मी ही हातकणंगले मतदारसंघातून ईच्छुक : डॉ. संजय पाटील
खा.महाडिक यांनी माझ्या ऐवजी भावजय चे नाव पुढे केले
कोल्हापूर : प्रतिनिधी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून इच्छुक म्हणून माझे नाव घेण्यास खासदार धनंजय महाडिक हे कार्यबाहुल्यामुळे विसरले असतील, असे सांगत या मतदारसंघातून भाजपकडून आपण प्रबळ दावेदार असल्याचा दावा मयूरचे डॉ. संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.
डॉ. पाटील म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी भूमिका आम्ही
भाजपच्या राज्य नेतृत्वाकडे सातत्याने मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही आम्ही त्यासाठी आग्रह धरला व हा मतदारसंघ भाजपसाठी पोषक असल्याचे सांगितले; परंतु त्यांनी हा मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात आमच्या घरी भेट दिली तेव्हाही तुम्ही या मतदारसंघाबाबत
आग्रह धरू नका, तो मिळण्याची एक टक्काही खात्री नसल्याचे स्पष्ट केले; परंतु त्यानंतर हा मतदारसंघ
शिवसेनेकडून भाजपकडे येईल, अशी भावना खासदार महाडिक यांनी व्यक्त केली व शौमिका महाडिक त्या जागेवर लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले. खासदार महाडिक कार्यबाहुल्यामुळे या मतदारसंघातून मीही लढण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यास विसरले असावेत. मयूर समुहाचे डॉ. संजय पाटील यांच्या वडीलांनी कोल्हापूर जिल्ह्यात तंबाखू संघाच्या माध्यमातून नावलौकिक मिळविला होता. यामुळे डॉ. पाटील यांनी हातकणंगलेतून माजी. खास निवेदिता माने यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
मी ही हातकणंगले मतदारसंघातून ईच्छुक : डॉ. संजय पाटील
|