बातम्या

मी लेचापेचा माणूस नाही - अजित पवार

I am not a man of lechape  Ajit Pawar


By nisha patil - 11/25/2023 4:50:34 PM
Share This News:



राज्यात मराठाआणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवारयांना डेंग्यूची लागण झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यानंतर अजित पवार यांची वारंवार बदललेली कृती पाहता त्यांना राजकीय डेंग्यू तर झाला नाही ना या चर्चांनी जोर धरला.अजित पवारांचं आजारपण खरं की खोटं याची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. आज या चर्चांवर अजित पवारांनी पहिल्यांदाच आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. 'मी लेचापेचा माणूस नाही.  गेले 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही.   मी माझी मतं गेल 32 वर्षे स्पष्टपणे मांडत असतो', असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.  तर अमित शाहांना तक्रार करण्यासाठी भेटलो नसल्याचं स्पष्टीकरण या वेळी अजित पवारांनी दिले आहे. 
     उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या आवारात सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार बोलत होते.  यावेळी अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर करण्याच्या सूचना दिल्या. बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.


मी लेचापेचा माणूस नाही - अजित पवार