बातम्या

आमदार सोडून गेल्याची मला चिंता नाही : खा.शरद पवार

I am not worried about MLA leaving Mr Sharad Pawar


By nisha patil - 2/21/2024 12:42:34 PM
Share This News:



आमदार सोडून गेल्याची मला चिंता नाही : खा.शरद पवार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : 'आमदार सोडून जाणं, चिंता करण्यासारखी गोष्ट नाही'. मला त्याचा काहीही फरक पडत नाही.ए आर अंतुले  मुख्यमंत्री असताना असंच झालं होतं. मी परदेशात गेलो असता त्यावेळी  ५९ पैकी ६ सोडून सर्व आमदार सोडून गेले होते. पण त्यानंतरच्या निवडणुकीत मला सोडून गेलेल्या पैकी  ९५ टक्के आमदार पराभूत झाले होते.यावेळीही  अशीच  इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे नक्की आहे , असा विश्वास शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत  व्यक्त केला आहे.

येणाऱ्या निवडणुकीबाबत बोलताना  शरद पवार म्हणाले की, लोकसभेला बारामतीबाबत आमच्या विरोधकांनी अजून उमेदवार जाहीर केला नाही.

कांदा निर्यातीवर बंदी घालणं चुकीचं - 

सरकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयावर बोलताना शरद पवार यांनी परखड मत व्यक्त केलंय.कांदा निर्यातीवर बंदी घालणं अत्यंत चुकीचं असल्याचं सांगत कांदा निर्यातीवर बंदी घालण्याच काहीही कारण नसून या सरकारची शेतकऱ्यांबाबत न्यायाची भूमिका नाही असही शरद पवार यांनी म्हटलय.


आमदार सोडून गेल्याची मला चिंता नाही : खा.शरद पवार