बातम्या
मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय...
By nisha patil - 10/24/2023 4:24:45 PM
Share This News:
मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय...
निलेश राणे यांचा मोठा निर्णय
त्याच्या या ट्विट ने राजकीय चर्चांना उधाण
निलेश राणे हे राजकारण सोडून देणार असल्याचं ट्विट निलेश राणे यांनी सोशल मीडियावर केले आहे. मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. त्याच्या या ट्विट ने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आल आले.
एकीकडे दसऱ्याची धामधूम सुरु असताना, तिकडे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं.
निलेश राणेंच्या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निलेश राणेंनी हा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या या ट्विटच्या चर्चेने सिंधुदुर्ग जिल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निलेश राणेंच्या कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बिघडणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना पक्षात घेण्यासाठी मोठी खेळी खेल्याचे ही बोलले जात आहे.
मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय...
|