बातम्या
"मला मुख्यमंत्री झाल्या सारख वाटतय," प्रशांत दामले
By nisha patil - 6/1/2024 2:15:03 PM
Share This News:
"मला मुख्यमंत्री झाल्या सारख वाटतय," प्रशांत दामले
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनादरम्यान अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले. नाट्यसंमेलन ही कलाकारांसाठी असल्याचंही ते म्हणाले.
मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय : प्रशांत दामले
.प्रशांत दामले म्हणाले,"नाट्यसंमेलन ही कलाकारांसाठी दिवाळी आहे. प्रत्येक कलाकार हा मनोरंजनसृष्टीतील विविध माध्यमावर काम करत असतो पण नाट्यसंमेलनानिमित्ताने विचारांचं आदान-प्रदान होतं. आम्ही कलाकार मंडळी तीन तास नाटकं करतो. पण 365 दिवस 24 तास अभिनय करणारी ही मंडळी मंचावर आहेत. त्यांच्या कार्याला नक्कीच सलाम. मात्र मला या नाट्य संमेलनाचे पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय".
प्रशांत दामले पुढे म्हणाले,"शासनाने दिलेला निधी योग्यरीत्या आपण वापरायला हवा. शासनाने आम्हाला योग्य त्या उपाययोजना पुरवाव्यात. - रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीत नाटकाचा गोडवा निर्माण करावा. मुख्यमंत्री साहेब नाट्यगृह बांधणं आणि ती सांभाळणे सोपं आहे. अलीकडेच सांस्कृतिक मंत्री म्हणाले की,"आम्ही सत्तर नाट्यगृह बांधणार", हे ऐकून कलाकार मंडळी आनंदी झालो आहोत. पण आहे ती नाट्यगृह योग्यरीत्या मेंटेन ठेवायला हवीत. नाट्यगृहाचे दर, लाईट बिल, सुविधांची वानवा आहे. त्यात सरकारने लक्ष घालावे. थेट महापालिका आयुक्तांसमोरचं प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे
पिंपरी चिंचवड शाखेच्या नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचं दुसरा अंक पाहायला मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. पुण्यातील नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचे आमंत्रणचं मिळाले नव्हते, असं म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या पिंपरीतील उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार असल्याचं कळवलं आहे. तसेच 5 जानेवारी 2024 होणाऱ्या पुण्यातील नाट्य संमेलनाला ऐनवेळी अनुपस्थित राहिलेले शरद पवार ही आज पिंपरीतल्या नाट्य संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आज तरी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसतील, अशी शक्यता होती. पुण्यात काल जे नाट्य घडलं ते आज पिंपरीत घडणार नाही, अशी अपेक्षा होती.
अजित पवारांनी दांडी मांडलेल्या संमेलनाच्या मंचावर मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांचा सत्कार पार पडला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीचं हा सत्कार करण्याची ईच्छा व्यक्त केली. सुत्रसंचालकांनी ही तसं नमूद केलं. उद्घाटन सोहळ्याच्या नियोजनात हा सत्कार नमूद नव्हता. अजित पवारांनी ज्यांच्यामुळं मंचावर येणं टाळलं, त्याच शरद पवारांचा सत्कार करण्याची ईच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्यानं उपस्थितांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली.
"मला मुख्यमंत्री झाल्या सारख वाटतय," प्रशांत दामले
|