बातम्या
माझा जन्म एका धर्मनिरपेक्ष कुटु्ंबात झाला.अभिनेत्री सारा अली खान
By nisha patil - 3/22/2024 9:25:39 PM
Share This News:
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या चर्चेत आहे. सलग दोन आठवड्यात तिचे दोन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असते. या माध्यामातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. तर, दुसरीकडे तिला काहीजण ट्रोलही करतात. सारा अली खानला तिच्या आडनावावरून आणि धर्मावरून अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. यावर भाष्य न करणाऱ्या सारा अली खानने आता ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी कधीही माफी मागणार नसल्याचे सारा अली खानने सांगितले.
सारा अली खानची आई अमृता सिंह हिंदू आहे, तर वडील सैफ अली खान मुस्लिम आहेत. त्यामुळे साराला आडनाव आणि धर्मावरून ट्रोलर्सच्या टोमण्यांना, ट्रोलिंगला सामारे जावे लागते. तिने आडनावावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
माझा जन्म एका धर्मनिरपेक्ष कुटु्ंबात झाला.अभिनेत्री सारा अली खान
|