बातम्या

मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईन; शिवसेना आमदाराचे चॅलेंज

I will hang myself in Bhar Chowk if Modi is not PM again


By nisha patil - 11/1/2024 6:32:23 PM
Share This News:



हिंगोली: हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना  आमदार संतोष बांगर  हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत  गेले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण आता संजय बांगर वादात नाहीत, तर स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भरचौकात फाशी घेईल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं आहे. याआधीही त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती. आता मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल, असे बांगर म्हणाले आहेत. 

संतोष बांगर यांचं चॅलेंज-

कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्याकारणाने चर्चेत असतात. आज त्यांनी एक नवीन चॅलेंज केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. तसे झाले नाही तर स्वतः भर चौकात फाशी घेणार असल्याचे चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. संतोष बांगर यांच्या नव्या चॅलेंजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याआधीही त्यांनी मिशी कापण्याचं चॅलेंज केले होते. 


मिशी कापण्याचं चॅलेंज - 

कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता न आल्यास मिशी कापेल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं होतं. पण निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली. महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची राज्यभर चर्चा झाली होती. आमदार बांगर यांनी या निवडणुकीवरुन चॅलेंज दिले होते. "या पॅनेलच्या 17 पैकी 17 जागा निवडून नाही आल्या तर मिशी ठेवणार नाही, असं आमदार संतोष बांगर म्हणाले होते. त्यावेळीही त्यांची जोरदार चर्चा झाली होती.


मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईन; शिवसेना आमदाराचे चॅलेंज