बातम्या
मी तुमच्यात असेन नसेन, मराठ्यांची ही एकजुट फुटू द्यायची नाही-मनोज जरांगे पाटील झाले भावूक
By nisha patil - 1/20/2024 7:25:34 PM
Share This News:
मी तुमच्यात असेन नसेन, मराठ्यांची ही एकजुट फुटू द्यायची नाही-मनोज जरांगे पाटील झाले भावूक
अंतरवाली सराटी - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आंदोलन छेडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मनोज जरांगे पाटील हे हजारों मराठा आंदोलकांसह आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी मधून आज मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी भावूक होत मराठा समाजाला आवाहन केलंय. ‘मराठ्यांना शेवटच सांगणं आहे मी तुमच्यात असेन नसेन मला माहित नाही, मराठ्यांची ही एकजुट फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटायचं नाही. आपल्या मुलांना संपवण्याचा घाट का घातला आहे. आपली मुलं संपली पाहिजेत, अस त्यांना वाटत आहे, आमचं आंदोलन हे सहज घेत आहेत. आमच्या नोंदी सापडूनही हे आरक्षण देत नाहीत, असं जरांगे पाटील म्हणाले.
मी तुमच्यात असेन नसेन, मराठ्यांची ही एकजुट फुटू द्यायची नाही-मनोज जरांगे पाटील झाले भावूक
|