बातम्या
डॉ राजेंद्र भस्मे यांना आय डी ए चा जीवनगौरव सन्मान
By nisha patil - 1/14/2025 6:24:21 PM
Share This News:
डॉ राजेंद्र भस्मे यांना आय डी ए चा जीवनगौरव सन्मान
कोल्हापूर दिनांक 12 जानेवारी 2025 इंडियन डेंटल असोसिएशन कोल्हापूर शाखेच्या वतीने 2024 च्या जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व दंतवैद्य डॉक्टर राजेंद्र भस्मे यांना गौरवण्यात आले दरवर्षी जीवनगौरव हा पुरस्कार राष्ट्रीय दंतवैद्य दिना दिवशी दंत वैद्याला दिला जातो
डॉ राजेंद्र भस्मे हे गेली 43 वर्षे वरून तीर्थवेस व गांधीनगर येथे दंतवैद्यक व्यवसाय करत आहेत . दंतवैद्यकीय सेवेबरोबरच वृत्तपत्रीय लिखाण व विशेषता क्रीडा पत्रकारिता या माध्यमातून त्यांनी आजवर विपुल लेखन केले आहे डेंटिस्ट डे निमित्त आयडिए आज येथे आयोजित केलेल्या विशेष समारंभात डॉक्टर भस्मे यांना जीवन पुरस्कार प्रदान करण्यात आला दंंतवैद्य डॉ सुधींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना मानपत्र स्मृतीचिन्ह व शाल देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी आयडीए कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ दिग्विजय पाटील सचिव डॉ प्रसाद कोळी आणि आणि राज्यसचिव डॉ विकास पाटील खजिनदार डॉ रमेश पोरवाल कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक सागर पाटील, श्रावणी पाटील उपस्थित आदी मान्यवर उपस्थित होते डॉ भस्मे व त्यांच्या एकूण जीवन प्रवासातील वाटचालीचा वेध घेणारी चित्रफीत याप्रसंगी प्रदर्शित करण्यात आली त्याला उपस्थितांनी मोठ्या प्रमाणावर दाद दिली
डॉ भस्मे याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले या व्यवसायात येणाऱ्या तरुण डॉक्टरांना मी सांगू इच्छितो की उपजीविकेसाठी व्यवसाय जरूर करा पण हे करत असताना सेवाव्रती वृत्ती सोडू नका जीवनात एखादा छंद,कला आवर्जून जोपासा त्यामुळे व्यक्तिगत व्यक्तिमत्त्व विकासात फायदा तर होतोच पण पण व्यवसाय करतानाही त्यातून आपण परमोच्च असा मानसिक आनंदही मिळवू शकतो .वाचन आणि लेखनाच्या माध्यमातून मी तो मिळवत गेलो डॉ भस्मे यांच्या कार्यकर्तृत्वाचे याप्रसंगी उपस्थितांनी भरपूर कौतुक केले विशेषतः क्रिकेट विषयक आकडेवारी रंजक पद्धतीने सादर करण्यात डॉ भस्मे यांचा असलेला हातखंडा वाचक अजूनही विसरलेला नाही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे आणि संगणकीय प्रगतीमुळे क्रिकेटमधील सांख्यिकी आकडेवारी याबाबतीत आजकाल क्रांती झाल्याचे दिसत असले तरी या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या त्याकाळी डॉ भस्मे डॉक्टर यांनी हे सर्व रेकॉर्ड स्वतः मेंटेन केले होते आणि त्या आधारे ते वृत्तपत्रात लिहीत असलेले लेख अतिशय रंजक ठरत असत.
लिखाणाची त्यांची ही आवड गेली चार दशकाहून अधिक काळ अव्याहतपणे सुरू आहे वैद्यकीय व्यवसायातील पदवी त्यांनी विशेष प्राविण्यासह तर मिळवलीच परंतु वृत्तपत्र आणि संवाद शास्त्र या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीही त्यांनी अव्वल क्रमांकात राहून मिळवली दंतवैद्यकीय सेवा आणि पत्रकारिता यांचा सुंदर मिलाप असणारी त्यांची कारकीर्द म्हणजे दुग्ध शर्करा योग असल्याचे डॉ भस्मे यांच्या दंतवैद्य मित्र आणि मित्रांनी यावेळी आवर्जून नमूद केले क्रिकेट आकडेवारीचा चालता बोलता इतिहास म्हणूनही डॉक्टरना कोल्हापूरकर ओळखतात आयडिए चा आजचा हा कार्यक्रम कोल्हापुरातील प्रसिद्ध हॉटेल वृषाली येथे संपन्न झाला याप्रसंगी स्वागत अध्यक्ष डॉ दिग्विजय पाटील आणि समारोप डॉ प्रसाद कोळी यांनी केले सूत्रसंचालन डॉ प्रदीप्ता पाटील व डॉ पल्लवी सोनवणे यांनी केले
डॉ राजेंद्र भस्मे यांना आय डी ए चा जीवनगौरव सन्मान
|