बातम्या
ज्येष्ठ संपादक वसंतराव दत्तवाडे यांना ‘इचलकरंजी भूषण’ पुरस्कार जाहीर
By nisha patil - 5/1/2024 11:27:42 AM
Share This News:
ज्येष्ठ संपादक वसंतराव दत्तवाडे यांना ‘इचलकरंजी भूषण’ पुरस्कार जाहीर
इचलकरंजी/प्रतिनिधी - येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी वृत्तपत्र क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी ‘दैनिक महासत्ता’ चे संपादक वसंतराव दत्तवाडे यांचा ‘इचलकरंजी भूषण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तर सामाजिक कार्यासाठी सौ. रमा अच्युत फाटक, क्रीडा क्षेत्रात वस्त्रनगरीचे नांव उंचावणारा कु. अनिकेत सुभाष माने याला ‘क्रीडा’, वस्त्रोद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे दीपक रामचंद्र राशिनकर यांना ‘वस्त्रोद्योग’, शैक्षणिक क्षेत्रात लौकिक असलेले श्री माधव विद्या विद्यामंदिरला ‘शैक्षणिक’ आणि उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल युवा उद्योजक कैश शौकत बागवान यांना ‘उद्योजक‘ यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव यांनी पुरस्कारांची घोषणा केली.
पत्रकार दिनी शनिवार 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता रोटरी क्लब सभागृह दाते मळा येथे हा पुरस्कार समारंभ होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांची उपस्थिती असणार आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव, उपाध्यक्ष बसवराज कोटगी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष सुनिल सातपुते यांनी केले आहे.
यावेळी संघटनेचे सचिव शिवानंद रावळ, खजिनदार महावीर चिंचणे, रामचंद्र ठिकणे, अनिल दंडगे, पंडीत कोंडेकर, सुभाष भस्मे, बाबासो राजमाने, हुसेन कलावंत, चिदानंद आलुरे, धर्मराज जाधव, सुभाष बोरीकर, भाऊसाहेब फास्के, अतुल आंबी, पांडुरंग पिळणकर, महेश आंबेकर, शितल पाटील, छोटुसिंग रजपुत, इराण्णा सिंहासने, विजय चव्हाण उपस्थित होते.
ज्येष्ठ संपादक वसंतराव दत्तवाडे यांना ‘इचलकरंजी भूषण’ पुरस्कार जाहीर
|