बातम्या

मोकाट ,भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा इचलकरंजी काॅंग्रेसची महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

Ichalkaranji Congress has requested the municipal administration


By nisha patil - 6/13/2023 4:35:40 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी इचलकरंजी शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करुन नागरिकांना दिलासा द्यावा , अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर काॅंग्रेसच्या वतीने महापालिका प्रशासनास देण्यात आले.यावेळी महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त केतन गुजर यांनी निवेदन स्विकारले.

या निवेदनात म्हटले आहे की ,
इचलकरंजी शहरामध्ये मोकाट व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच शहरातील लिंबू चौक  तांबे माळ  घोडके नगर, षटकोन चौक, संग्राम चौक, गोकुळ चौक व लालनगर या परिसरातील बालकांसह 22 जणांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला करून जखमी केले आहे. तसेच 15 दिवसांपूर्वी गावभाग परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 30 जणांचा चावा घेऊन जखमी केले होते. शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण व त्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून सकाळी 6
 वाजल्यापासून शाळेला व कॉलेजला जाणारे विद्यार्थी तसेच फिरायला जाणारे आबालवृध्द यांच्यावर सातत्याने भटक्या कुत्र्यांच्या टोळीकडून हल्ला होत असतो. याबाबत इचलकरंजी महानगरपालिकेने याच्या मुळाशी जाऊन कारणे शोधण्याचीआवश्यकता आहे. तसेच त्यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे.तरी
सबब वरील सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शहरामध्ये वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या व उपद्रवाबाबत इचलकरंजी महानगरपालिकेने तातडीने 
उपाययोजना करावी तसेच भटक्या कुत्र्यांनी ज्या नागरीकांचा चावा घेऊन जखमी केले  त्यांच्या औषधोउपाराचा खर्च इचलकरंजी महानगरपालिकेने करावा ,अशीही मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.निवेदन देणा-या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व माजी नगरसेवक शशांक बावचकर , शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय कांबळे ,
बाबासो कोतवाल , युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद खुडे ,शशिकांत देसाई ,सौ.मीना बेडगे ,समीर शिरगावे ,रियाज जमादार , चंद्रकांत कांबळे , सावित्री हजारे ,वंदना भंडारे , ओंकार आवळकर ,तौसिफ लाटकर , सचिन साठे , रविराज पाटील , नंदकिशोर जोशी ,प्रविण फगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


मोकाट ,भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा इचलकरंजी काॅंग्रेसची महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी