बातम्या

इचलकरंजी जनता सहकारी बँकेला उत्कृष्टता पुरस्कार प्राप्त

Ichalkaranji Janata Sahakari Bank received Excellence Award


By nisha patil - 9/30/2024 11:43:38 AM
Share This News:



पुणे येथे दि. महाराष्ट्र अर्बन को ऑप बँक्स फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये रू २५०० कोटी ते रू ५००० कोटी पर्यंत ठेवी असणाऱ्या सहकारी बँका मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेस सर्वोत्कृष्ट बँक म्हणून तृतीय क्रमांकने सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे व बँकेचे सर्व संचालक मंडळास देण्यात आला.

यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे संचालक सतीशजी मराठे, सहकार आयुक्त व निंबधक दीपक तावरे, फेडरेशन चे अध्यक्ष अजयजी ब्रम्हेचा, उपाध्यक्षा सौ वैशालीताई आवाडे, कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेकजी जुगादे यांच्यासह क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे संचालक बाबुराव पाटील, महेश सातपुते, बंडोपंत लाड, सुभाष जाधव, शैलेश गोरे, राजू चव्हाण, सचिन देवरुखकर, सचिन केस्ती बँकेचे सी ई ओ संजय शिरगावे यांच्यासह राज्यातील विविध सहकारी बँकेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Ichalkaranji Janata Sahakari Bank received Excellence Award