विशेष बातम्या

इचलकरंजी लायन्स क्लब १५ पारितोषिकाने सन्मानित

Ichalkaranji Lions Club honored with 15 awards


By nisha patil - 6/28/2023 12:33:50 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  लायन्स इंटरनॅशनल या संस्थेच्या कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, व सातारा या सहा जिल्ह्यातील 87 क्लबचा प्रांतीय कर्तृत्व गौरव हा पारितोषिक वितरण सोहळा सांगली येथे उत्साहात संपन्न झाला. या समारंभामध्ये लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीला विविध सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल १५ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये महेंद्र बालर (बेस्ट प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रीक्ट), संदीप सुतार (बेस्ट ट्रेजरर ऑफ डिस्ट्रीक्ट), सौ.कनकश्री भट्टड (बेस्ट लायन लेडी ऑफ डिस्ट्रिक्ट),विजयकुमार राठी (विशेष सन्मानित) 
बेस्ट हंगर रिलीफ, बेस्ट स्क्रॅप बुक , बेस्ट फोटो काँटेस्ट, क्लब बुलेटिन काँटेस्ट , बेस्ट फंड राईसिंग प्रोग्राम , बेस्ट डिजी व्हीजिट , बेस्ट अक्टिविटी महिला मॅराथॉन,बेस्ट अक्टिविटी महिला नमो नारी, डिस्ट्रिक्ट हंगर ॲक्टिविटी, बेस्ट स्क्रॅप बुक मल्टिपल पारितोषिक देवून गौरवण्यात आले. हा सोहळा लायन्सचे प्रांतपाल राजशेखर  कापसे व विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यावेळी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे प्रेसिडेंट महेंद्र बालर , संदीप सुतार , लक्ष्मीकांत भट्टड, महेश सारडा, राकेश धुत,नंदकुमार बांगड, अरुण पाटील , ओम आगरवाल, कनकश्री भट्टड, कांता बालर, स्वाती राठी, संगीता सारडा तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इचलकरंजी लायन्स क्लब १५ पारितोषिकाने सन्मानित