बातम्या

इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्र  उर्मिला गायकवाड अध्यक्षपदी निवड

Ichalkaranji Municipal Corporation Area Urmila Gaikwad elected as President


By nisha patil - 6/16/2023 4:38:59 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी आगामी निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी पक्षाची महिला आघाडी जाहीर करण्यात आली आहे. इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्र अध्यक्षपदी उर्मिला गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर इचलकरंजी व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडी कार्याध्यक्षा म्हणून नजमा शेख यांची नियुक्ती करण्यात आली.तर इचलकरंजी विधानसभा ग्रामीण महिला आघाडी अध्यक्षा म्हणून  ललिता पुजारी आणि हातकणंगले विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा म्हणून  संगिता नरदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी राजश्री आडगाणी, नयना डोंगरे, शोभा भाट, जयश्री शेलार यांची तर सेक्रेटरीपदी सपना भिसे, रजनी शिंदेल मंगल सुर्वे व शाकिरा नायकवडी यांची आणि खजिनदारपदी अर्चना कुडचे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सल्लागार म्हणून अंजली बावणे, हमिदा गोरवाडे, जेवरबानु दुंडगे, लक्ष्मी सपाटे व शकुंतला जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्यपदी विविध भागातील 46 महिलांची निवड केली आहे. ताराराणी पक्ष कार्यालयात संपन्न कार्यक्रमात सर्व पदाधिकार्‍यांना आमदार प्रकाश आवाडे आणि ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. स्वागत कार्याध्यक्षा नजमा शेख यांनी तर प्रास्ताविक महिला आघाडी अध्यक्षा सौ. उर्मिला गायकवाड यांनी केले.
यावळी आमदार प्रकाश आवाडे यांनी, केवळ महिला सक्षमीकरण याच हेतुने ही महिला आघाडी करण्यात आली आहे. महिलांनी स्वावलंबी होऊन आपला व आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. आगामी काळातील आव्हानात्मक परिस्थितीत आपल्याला काम करावे लागणार आहे. महापालिका निवडणूकीसाठी जे प्रभाग निश्‍चित होतील त्या प्रत्येक प्रभागात स्वतंत्र कार्यकारीणी कार्यरत असेल. त्याचबरोबर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पाच गांवांसह हातकणंगले व शिरोळ तालुक्याची कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार असून महिलांनी त्याचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. राहुल आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, अंजली बावणे, श्रीमती जुगनू पिरजादा यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तारा न्यूज साठी इचलकरंजीहून विनोद शिंगे


इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्र  उर्मिला गायकवाड अध्यक्षपदी निवड