बातम्या

इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यानी घेतला पूरस्थितीचा आढावा

Ichalkaranji Provincial Officer reviewed the flood situation


By nisha patil - 7/24/2023 4:44:58 PM
Share This News:



इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यानी घेतला पूरस्थितीचा आढावा 

खोची ता.हातकणंगले परिसरातून वाहत असलेल्या वारणा नदीच्या  पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होऊ लागली आहे.त्यामूळे संभाव्य पूर परिस्थितीच्या आढाव्यासाठी इचलकरंजी प्रांताधिकारी मोसमी बर्डे- चौगुले यांनी  वारणा नदीकाठच्या खोची,भेंडवडे या गावांना भेटी दिल्या. येथील पूरबाधित कुटुंबे व त्यांची निवारा व्यवस्थेची पाहणी करून त्याचा आढावा घेतला.व आपत्ती व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्या समवेत हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे,पंचायत समिती गट विकास अधिकारी शबाना मोकाशी उपस्थित होत्या. 
   यावेळी त्यांनी दोन्ही गावातील स्थलांतर होणारी कुटुंबे, त्यांची निवारा व्यवस्था तसेच स्थलांतरित होणारे कुटुंबीयांची जनावरे त्यांची व्यवस्था,
पूरकाळात पिण्याचे पाणी व्यवस्था आदीबाबत माहिती घेतली व मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच अभिजीत चव्हाण,तलाठी प्रमोद पाटील,ग्रामविकास अधिकारी आर. एस.मगदूम,माजी पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव,अजय पाटील, सदस्य जगदीश पाटील,प्रमोद सुर्यवंशी,राजकुमार पाटील,पोलीस पाटील मनोज सपकाळ,कृषी सहाय्यक सुधीर सोळांकुरे,तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र जंगम,नंरदे पशुवैद्यकीय अधिकारी एस.डी.जाधव,तसेच विरोचन शिंदे,बाळासाहेब पाटील,प्रकाश पाटील,कोतवाल अर्चना आडके आदी उपस्थित होते. 
     भेंडवडे येथे पूर छायेत येणाऱ्या बागडी समाज वस्ती,प्राथमिक विद्यामंदिर,ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देवून पाहणी केली. व  स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.यावेळी उपसरपंच हणमंत पाटील,अभिजित माने,ग्रामपंचायत सदस्य हणमंत पवार,संग्राम माने,नयुम पठाण, तंटामुक्त समिती महावीर कांबळे,
विजय माने,तलाठी प्रविण तोडकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकाते आदी उपस्थित होते.
फोटो - खोची येथे वारणा नदीच्या संभाव्य महापूराच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी मोसमी चौगुले बर्डे यांनी  पूरग्रस्तांच्या निवारा व्यवस्थेची पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे,गटविकास अधिकारी शबाना मोकाशी,सरपंच अभिजीत चव्हाण, तलाठी प्रमोद पाटील,पोलीस पाटील मनोज सपकाळ, ग्रामविकास अधिकारी आर.एस.मगदूम.


इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यानी घेतला पूरस्थितीचा आढावा