बातम्या
"इचलकरंजीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न...
By nisha patil - 4/1/2025 10:39:37 PM
Share This News:
"इचलकरंजीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न...
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती..
इचलकरंजीतील लायन्स ब्लड बँक, दाते मळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री मा.ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे व प्रदेश उपाध्यक्ष आ. सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
इचलकरंजीतील लायन्स ब्लड बँकेतर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांचा सत्कार, ज्यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाला गती दिली आहे.यावेळी आमदार अशोकराव माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, इचलकरंजी भाजपा अध्यक्ष पै. अमृतमामा भोसले यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. राहुल आवाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत इचलकरंजीच्या उज्ज्वल भविष्याची आशा व्यक्त केली. हा सत्कार सोहळा विकासाच्या नव्या वाटचालीचे प्रतीक ठरला असून, महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाने दृढनिश्चय केला आहे.
"इचलकरंजीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न...
|