बातम्या
इचलकरंजीत मोकाट - भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची काॅंग्रेसची आयुक्तांकडे मागणी
By nisha patil - 7/18/2023 7:11:54 PM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी इचलकरंजी शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा ,या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पक्षाचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक शशांक बावचकर यांच्या नेतृत्वाखाली
नुकतीच महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे मागणी केली.तसेच याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की ,इचलकरंजी शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.त्यामुळे या कुञ्यांचा
तातडीने बंदोबस्त तातडीने करावा, या संदर्भात इचलकरंजी शहर राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने मागील १३ जून रोजी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले होते.पण , याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसत आहे. यासाठी नुकताच इचलकरंजी शहर राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने पक्षाचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक शशांक बावचकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने
महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेऊन भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत मागील
एक महिन्यात काय कार्यवाही झाली , याबाबत खुलासा करण्यात यावी , अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आयुक्त श्री. दिवटे यांनी शिष्टमंडळातील पदाधिका-यांच्या भावना समजावून घेऊन तातडीने
कुञ्यांची निर्बीजिकरणाची मोहीम राबवली जाईल. तसेच शहरातील चिकन 65 गाडयांची माहिती मागवून घेऊन नियमांचे उल्लंघन करणा-या संबंधितांवर योग्य कारवाइई करण्यात येईल ,अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. यावेळी इचलकरंजी शहर राष्ट्रीय कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, शहर युवक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद खुडेइचलकरंजी शहर महिला कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष बिस्मिल्लाह गैबान ,इचलकरंजी शहर काँग्रेस भटके विमुक्त विभागचे अध्यक्ष रवि वासुदेव, ओंकार आवळकर, रविराज पाटील,दिलीप पाटील,योगेश कांबळे, जोशी काका,जोश्ना भिसे
यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इचलकरंजीत मोकाट - भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची काॅंग्रेसची आयुक्तांकडे मागणी
|