विशेष बातम्या

इचलकरंजीत राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुनर्स्थापना दिन साजरा

Ichalkaranjit Rashtra Seva Dal celebrated the Restoration Day


By nisha patil - 5/6/2023 6:44:33 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  येथील आंतरभारती विद्यालयात राष्ट्र सेवा दल केंद्राच्यावतीने पुनर्स्थापना दिन साजरा करण्यात आला. 
 जेष्ठ सैनिक अनिल होगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील यांच्या सेवादल सेवादल गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विनायक होगाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संघटक रोहित दळवी यांनी गत 3 महिन्याचे अहवाल वाचन केले. 
यावेळी अशोक चौगुले, सुरेखा गाताडे, प्रमोद आवळे, शहनाज मोमीन, जयप्रकाश जाधव, नौशाद शेडबाळे, स्नेहल माळी, विभावरी नकाते, संजय आढाव, शरद वास्कर, प्रफुल्ल आवळे आदींसह सेवादलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी आढाव यांनी  केले.


इचलकरंजीत राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुनर्स्थापना दिन साजरा