इचलकरंजीत वाहनांची तपासणी मोहिम ; 72 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

Ichalkaranjit Vehicle Inspection Mission 72 Penal action against motorists


By nisha patil - 6/22/2023 11:15:27 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी येथील वाहतूक पोलीस शाखेने आज शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात वाहनांची तपासणी मोहिम राबवली. दिवसभरात या मोहिमेत 72 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

  इचलकरंजी शहरात अनेकवेळा अल्पवयीन किंंवा विना परवाना वाहन चालवताना विद्यार्थी मिळून येतात. भरधाव वाहन चालवल्याने अनेक वेळा अपघातही होतात. त्यामुळे   वाहतूक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात वाहनचालकांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी बहुतांश विद्यार्थ्यांसह वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन उल्लंघन करताना मिळून आले. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या 72 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहिम अशीच सुरु राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.


इचलकरंजीत वाहनांची तपासणी मोहिम ; 72 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई