बातम्या
इचलकरंजीत नववर्ष स्वागतासाठी भव्य महामंगलिक आध्यात्मिक सोहळा संपन्न
By nisha patil - 1/1/2025 10:59:56 PM
Share This News:
इचलकरंजीत नववर्ष स्वागतासाठी भव्य महामंगलिक आध्यात्मिक सोहळा संपन्न
श्री तेरापंथी भवन, कागवाडे मळा येथे श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्या वतीने नववर्षानिमित्त आयोजन
इचलकरंजीतील श्री तेरापंथी भवन येथे नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य महामंगलिक आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला. युगप्रधान शांतिदूत आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य डॉ. मुनिश्री पुलकित कुमारजी आणि आदित्य कुमारजी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने हा सोहळा अध्यात्मिकतेने भारावून गेला.
कार्यक्रमास आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनीही उपस्थिती लावली. मुनिश्रींचे दर्शन घेत त्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आपल्या भाषणातून त्यांनी समाजाला अध्यात्म, शांतता, आणि नैतिकतेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात तेरापंथी सभेचे पदाधिकारी, स्थानिक जैन समाजबांधव, श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य सोहळ्याने परिसरात आध्यात्मिक उत्साह आणि सकारात्मकतेचा संदेश पोहोचवला.
इचलकरंजीत नववर्ष स्वागतासाठी भव्य महामंगलिक आध्यात्मिक सोहळा संपन्न
|