बातम्या
इचलकरंजीत बेदम मारहाण करून पतीकडून पत्नीची हत्या...
By nisha patil - 6/19/2024 1:41:39 PM
Share This News:
इचलकरंजीतील संग्राम चौक येथे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने चादरीत मृतदेह लपवून ठेवण्याचा संशय पोलिसांनी घटनेनंतर व्यक्त केला आहे.करिश्मा किसन गोसावी असे पत्नीचे नाव असून कौटुंबिक वादातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. किसन गोसावी हा पत्नी करिश्मा व तीन मुलांसह भाड्याच्या घरात राहण्यास होता. दोन महिन्यांपूर्वी तो याठिकाणी राहण्यास आला होता. वारंवार पती-पत्नीमध्ये खटके उडत होते. सोमवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यातून किसनने करिश्माला मारहण केल्याची घटनास्थळी चर्चा होती.त्यामुळे दोन्ही मुलांची भेट शेवटी झालीच नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, दिवसभर करिश्मा आढळून न आल्याने नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडले. तेव्हा घरात करिश्माचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांना यावेळी मोठा धक्का बसला. करिश्मा यांच्या खुनाची घटना समजताच नातेवाईकांनी मोठ्या संख्येने धाव घेतली. दोन ते तीन वेळा मुले घराजवळ गेली मात्र त्यांना हुसकावून लावण्यात आले.
इचलकरंजीत बेदम मारहाण करून पतीकडून पत्नीची हत्या...
|