बातम्या
आंबेवाडी ते कोतोली फाटा रोडवर मुर्ती बणविणारे कारखाने सुरू
By nisha patil - 7/2/2024 11:38:03 PM
Share This News:
आंबेवाडी ते कोतोली फाटा रोडवर मुर्ती बणविणारे कारखाने सुरू
दगडावर कोरीव काम करून मुर्ती वापरण्याकडे लोकांचा कल
कलाकार व व्यावसायिक यांना चांगले दिवस
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी दगडावर कोरीव काम करून आकर्षक मुर्ती, मंदिरे, भांडी बणविण्यासाठी कारागीर मग्न झाले आहेत.
आंबेवाडी ते केर्ली दरम्यान दगडापासून मूर्ती बनवणारे कारखाने तसेच दगडावर हाताने कोरीव काम घडवणारे कलाकार यांच्यावतीने कोल्हापूर रत्नागिरी हायवेच्या रोड टच दगडाला मूर्ती देण्याचे कोरीव काम सुरू आहे. या दगडाच्या मुर्तींना कोल्हापूर जिल्ह्या सह पर जिल्ह्यातून मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. दगडापासून घरासाठी लागणारी देखणी समोर ची चौकट, घरामध्ये मसाला चेचण्यासाठीचा खलबुदा, पोळी तयार करण्यासाठी तो वरवंटा तसेच आकर्षक मूर्ती गणेश, बाळूमामा, हनुमान आदी मूर्ती बनवू देतात. या मूर्ती आपल्या घरी मंदिरात पुजण्यासाठी लोकांचा कल वाढल्याने कारागीरांना सध्या चांगले दिवस आले आहेत.कार्यक्रमात भेट देण्यासाठी याचा वापर केला जात आहे.
आंबेवाडी ते कोतोली फाटा रोडवर मुर्ती बणविणारे कारखाने सुरू
|