बातम्या

जर यात दोषी आढळलात, तर होणार कठोर कारवाई - ना. प्रकाश आबिटकर

If found guilty strict action will be taken noPrakash Abitkar


By nisha patil - 2/1/2025 9:47:47 PM
Share This News:



 सध्या देण्यात येत असलेल्या औषधांच्या नमुन्याची तपासणी करताना यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. रुग्णालयामध्ये चांगले दर्जाची आणि नामांकित कंपन्यांचे औषधे पूर्ण असलेल्या औषधांची ड्रग्स कंटेंट तपासून घेण्यात यावे. असे आवाहन ना. प्रकाश आबिटकर यांनी मुंबई येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना दिलीय.

 वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरवण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्याची त्रयस्थ पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देश दिले असून सध्या देण्यात येत असलेल्या औषधांच्या नमुना ची तपासणी करताना यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच बॉम्बे नर्सिंग कायद्यानुसार नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयाची त्यांच्या तपासणीचे आणि सुविधांचे दर ठळक स्वरूपात रुग्णालयामध्ये प्रसिद्ध करावे रुग्णांची कुठल्याही प्रकारे आर्थिक फसवणूक होता कामा नये. तसेच योजनेअंतर्गत असलेल्या रुग्णालयामध्ये रुग्णाला कुठेही पैसा लागू नये अशा तक्रारी समोर आल्यास संबंधितांवर कारवाई करावी. अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे असेही निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव नवीन सोना, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, आरोग्य सेवा आयुक्त अमगोत श्रीरंगा नायक यांच्यासह आरोग्य विभागातील विविध शाखांच्या अधिकारी उपस्थित होते.


जर यात दोषी आढळलात, तर होणार कठोर कारवाई - ना. प्रकाश आबिटकर
Total Views: 37