बातम्या
साहेब नसते तर दादा म्हशी वळत बसले असते ; या प्रश्नावर दादा काय म्हणाले पहा..
By nisha patil - 10/5/2024 5:03:42 PM
Share This News:
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात हायहोल्टेज...मतदारसंघ असलेल्या बारामतीत नुकतंच मतदान पार पडलं. मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाचे काही प्रकार उघडकीस आले. याबाबत सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघाला दृष्ट लागली असंही मत व्यक्त केलं.आता चौथ्या टप्प्यासाठी प्रचार सुरु झाला आहे. अशात अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. साहेब नसते तर दादा म्हशी वळत असते असं एक जण म्हणाला त्यावर अजित पवारांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.
अजित पवारांना शरद पवारांनी संधी दिली नसती तर अजित पवार म्हशी सांभाळत असते एकाने विचारलेल्या या प्रश्नावर अरे बाबा वळल्या असत्या म्हशी. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्यात काय? ” असं शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जी सभा घेतली त्यात अजित पवारांनी हे भाष्य केलं.“बारामतीत साठीच्या आतील आणि तरुण मंडळी म्हणायचे आम्हाला अजित दादा हवा. पण साठीच्या पुढची मंडळी म्हणायचे, नको राव उतार वयात पवार साहेबांसोबत राहू, असं भावनिक राजकारण केल्यानं विकास होत नाही”, असंही अजित पवारांनी सांगितलं.
साहेब नसते तर दादा म्हशी वळत बसले असते ; या प्रश्नावर दादा काय म्हणाले पहा..
|