बातम्या

अंकली ते चोकापर्यंतच्या शेतकऱ्यांना जमिनीचा चारपट मोबदला न मिळाल्यास नागपूर हायवेचे काम रोखणार

If the farmers from Ankle to Choka do not get four times compensation for the land


By nisha patil - 10/1/2025 8:40:08 PM
Share This News:



अंकली ते चोकापर्यंतच्या शेतकऱ्यांना जमिनीचा चारपट मोबदला न मिळाल्यास नागपूर हायवेचे काम रोखणार 
 

नागपूर रत्नागिरी हायवेचे काम ज्या ठिकाणी संपादन होऊन शेतकर्यांना चारपट मोबदला आहे मिळालेला आहे अशा ठिकाणी सुरू आहे . पण सांगली जिल्ह्यातील अंकली ते कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक या गावापर्यंत शेतकऱ्यांना अद्यापही भूसंपादन होऊन मोबदला मिळालेला नाही. विविध आंदोलन होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या या मागणीकडे शासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे अशातच हायवेचे अंकली ते चोकाकदरम्यानचे  काम सुरू करण्याबाबतची केंद्रीय महामार्ग प्राधिकरणांन निविदा  शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या ठिकाणी केलेल आहे

बाकीच्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना चारपट मोबदला मिळालेला आहे पण अंकली ते चोकाकदरम्यानच्या शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला देऊन त्यांच्यावर अन्याय करण्याचं धोरण शासनामार्फत सुरू आहे हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही पण कोणत्याही परिस्थितीत अंकली ते चोकाकपर्यंत रस्त्याचा रितसर भूसंपादन होऊन चारपट मोबदला शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय महामार्गाचे कोणतेही काम होऊ दिले जाणार नाही असा इशारा बळीराजा नागपूर रत्नागिरी हायवे शेतकरी कृती समितीने दिला. 
 

यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने अप्पर तहसीलदार  पवार साहेब यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली व आंदोलनाचा इशारा दिला यावेळी हनुमंत पाटील दीपक पाटील संभाजी कोईगडे उमेश विभुते दीक्षित इत्यादी समितीचे सदस्य उपस्थित होते.


अंकली ते चोकापर्यंतच्या शेतकऱ्यांना जमिनीचा चारपट मोबदला न मिळाल्यास नागपूर हायवेचे काम रोखणार
Total Views: 50