पण जर नेहमीच पाय सूजत असतील तर याकडे तुम्ही अधिक लक्ष दिले पाहिजे. पायाला सूज येण्या मागची कारणे काय असू शकतात जाणून घेऊयात.
1. हायपोथायरॉईडीझम
जेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा थायरॉईड संप्रेरके आणि त्यांची प्रथिने जास्त प्रमाणात रक्तवाहिन्यांमध्ये तयार होऊ लागतात. त्यामुळे शरीरात द्रव जमा होण्यास सुरुवात होते. हायपोथायरॉईडीझमचाही चयापचयावर परिणाम होतो. किडनीच्या रक्तप्रवाहावरही याचा परिणाम होऊ लागतो. त्यामुळे पाणी टिकून राहण्याची समस्या निर्माण होते आणि पायांना सूज येऊ शकते.
2. पोषक तत्वांचा अभाव
पायाला सूज येत असेल तर ते शरीरातील पोषक तत्वांच्या कमतेरतेमुळे असू शकते. आहारात शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळत नसतील तर पायाला सूज येऊ शकते. याशिवाय सोडियम युक्त अन्नपदार्थांचे सेवन केल्यानेही शरीरात पाणी साचते. त्यामुळे पाय सुजतात.
3. मूत्रपिंड निकामी होणे
जेव्हा मूत्रपिंड निकामी होतात तेव्हा रक्तातून लघवी फिल्टर करता येत नाही, त्यामुळे रक्तातील अल्ब्युमिन प्रोटीनची पातळी कमी होते आणि लघवीची पातळी वाढू लागते. अशा स्थितीत पायात सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. पचनाशी संबंधित समस्या देखील दिसू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.
4. यकृताचे नुकसान
यकृत खराब झाले तरी त्याच्या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. रक्ताभिसरण मंद होते. त्यामुळे यकृताकडे रक्त वाहून नेणाऱ्या नसांवर खूप दबाव येतो. शिरांवर वाढलेल्या दबावामुळे, पायांमध्ये द्रव साठू लागतो. ज्यामुळे सूज येते.