बातम्या
ठिबक व कृषी अवजारांचे अनुदान महिना अखेरपर्यंत जमा न झाल्यास कार्यालयास टाळे : बी आर एस
By nisha patil - 11/8/2023 6:02:57 PM
Share This News:
ठिबक व कृषी अवजारांचे अनुदान महिना अखेरपर्यंत जमा न झाल्यास कार्यालयास टाळे : बी आर एस
कोल्हापूर ठिबक व कृषी अवजारांचे अनुदान प्रलंबित असल्याच्या अनुषंगाने बी आर एस पक्षाच्या वतीने निवेदनातून अंतिम इशारा देण्यात आला आहे.
अवजारांचे अनुदान महिन्याभरात शेतकऱ्यांना न मिळाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याच आंदोलन करावे लागेल. कृषी यांत्रिकीकरण अनुदान शासनाकडून रखडले असून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व इतर यंत्र खरेदीसाठी विविध फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेतले असून त्यावर व्याज आकारणी सुरू आहे. सरकारी काम सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे प्रशासनाचे काम सुरू आहे .जिल्ह्यात शेकडो लाभार्थी वंचित आहेत वेळेत अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तालुकास्तरावरून जरी प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कार्यालयात आले तरीसुद्धा कार्यालयातील दिरंगाईमुळे अनुदान वेळेत मिळत नाही असा आमचा व शेतकऱ्यांचा आरोप आहे. प्रशासनाने वेळ काढू धोरण सोडून पात्र लाभार्थ्यांना अनुदान तातडीने द्यावे तसेच जिल्हास्तरावरील प्रस्ताव त्वरित निर्गत करावेत अन्यथा अधिकाऱ्यांना आमच्या रोशास सामोरे जावे लागेल. यांत्रिकीकरण अनुदानाच्या अनुषंगाने सबमिशन चे पैसे या महिन्यात मिळालेच पाहिजेत .तसेच राज्य शासनाच्या वतीने जमा झालेले एक कोटी रुपये दोन दिवसात तातडीने वितरित करावे .या वर्षीचे ठिबकचे प्रलंबित अनुदान तातडीने जमा करावे तसेच जवळपास 835 यांत्रिकीकरणाचे शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान या महिना अखेर पर्यंत मार्गी लावावे त्याचबरोबर ठिबकचे जवळपास 600 शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान या महिना अखेरीपर्यंत मार्गी लावावे अन्यथा महिना अखेरीस आम्हाला कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाचे कामकाज बंद पाडून टाळे ठोक आंदोलन करावे लागेल याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा बी आर एस नेते संजय पाटील यांनी दिला.
ठिबक व कृषी अवजारांचे अनुदान महिना अखेरपर्यंत जमा न झाल्यास कार्यालयास टाळे : बी आर एस
|