बातम्या

पोट साफ होत नसेल तर अवश्‍य करा ‘हे’ ५ योग…आणि पाहा कमाल

If the stomach does not clear then do these 5 yogas


By nisha patil - 3/23/2024 10:00:35 AM
Share This News:



चूकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना अपचनाचा त्रास होतो. ही समस्या दूर करण्यासाठी काहीजण औषधी गोळ्या घेतात. परंतु, या गोळ्यांनी तात्पुरता फायदा होतो. पुन्हा ही समस्या भेडसावते. ही समस्या कायम दूर ठेवायची असल्यास योग जास्त लाभदायक आहे. रोज केवळ १० मिनिटे हे योग केल्‍यास चांगला फायदा होतो. यामुळे अपचन दूर होऊन पोट साफ होते.

ही आसने करा

वज्रासन
गुडघ्‍यावर सरळ बसा. यादरम्‍यान हिप्‍स दोन्‍ही टाचांवर ठेवावे. डोळे बंद करुन दिर्घ श्‍वास घ्‍या. २ मिनिटे ही क्रिया करा.


मंडुकासन
वज्रासनच्‍या स्थितीत बसा. दोन्‍ही हातांचे अंगठे मध्‍ये ठेवत मुठी बंद करा. दोन्‍ही मुठी बेंबीच्‍या दोन्‍ही बाजूला ठेवत श्‍वास सोडा व यादरम्‍यान समोर झुकून हूनवटी जमिनीला टेकवा. थोडा वेळ याच अवस्‍थेत रहा. पुन्हा सुरवातीच्या स्थितीत या. ही क्रिया ५ वेळा करा.

अर्ध पवन मुक्‍तासन
सरळ पाठीवर झोपा. डावा पाय गुडघ्‍यातून वाकवून छातीजवळ न्‍या. नंतर हाताने पायाला घट्ट पकडत गुडघा नाकाला लावण्याचा प्रयत्‍न करा. काही वेळ याच स्थितीत राहा. ५ वेळा ही क्रिया करा.

पवनमुक्‍तासन
दोन्‍ही पाय छातीजवळ घ्या. त्‍यांना हाताने घट्ट पकडा. डोके थोडे वर उचलत गुडघे नाकाला लावण्याचा प्रयत्‍न करा. काही वेळ या स्थितीत रहा. ५ वेळा ही क्रिया करा.

कपालभाती प्राणायम
पद्मानसनच्‍या मुद्रेमध्‍ये बसा. दीर्घश्‍वास बाहेर सोडा. पोट आत घ्‍या. पुन्‍हा श्‍वास घेऊन ही क्रिया करा. असे २ मिनिटांपर्यंत करावे.


पोट साफ होत नसेल तर अवश्‍य करा ‘हे’ ५ योग…आणि पाहा कमाल