बातम्या
हाडांची झीज नसेल होऊ द्यायची तर आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
By nisha patil - 9/17/2023 7:39:20 AM
Share This News:
आजकालच्या बहुतेक लोकांमध्ये कॅल्शियमची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते. कॅल्शियम कमी असल्यामुळे शरीरातील हाडांची झीज होणे किंवा गुडघेदुखी होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.
तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपली हाडे देखील कमकुवत होतात, यामुळे आपल्या हाडांची झीज होऊ शकते. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर योग्य आहार घेणे गरजेचे आहे. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाणं फायदेशीर ठरते. सकाळी खजूर खाल्ल्यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात. तसंच पोटाच्या समस्यांपासून सुटका होते. सोबतच खजूर खाल्ल्यामुळे शरीरातील उर्जा वाढते. त्यामुळे खजूर खाणं शरीरासाठी गरजेचं असतं. तुम्हीही तुमच्या आहारात खजूरचा समावेश नक्की करा.
जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी असेल तर खजूरचा तुमच्या आहारात समावेश करा. खजूर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खजूरमध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील हाडे मजबूत करतात आणि आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करतात. खजूरमध्ये मॅगनीज, झिंक, सेलेनियम यासारखे पोषक घटक आढळतात. हे घटक शरीरातील लोह आणि कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात.
प्रत्येकाने दररोज रात्री दुधात 4 खजूर भिजवत ठेवावे आणि ते सकाळी खावे. आणि ते दूधही प्यावे, यामुळे तुमच्या पोटातील गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच जर तुम्ही दुधात खजूर टाकून ते उकळून खाल्ल आणि ते गरम दूध पिलं तर ते तुमच्या हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते
हाडांची झीज नसेल होऊ द्यायची तर आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
|