बातम्या
चहा पिताना ‘या’ 4 गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगले राखाल !
By nisha patil - 7/3/2024 7:42:07 AM
Share This News:
अतिप्रमाणात चहा पिणे शरीरासाठी घातक ठरते. म्हणून योग्य प्रमाणात म्हणजेच दिवभरात जास्तीत जास्त दोन ते तीन कप चहा प्यायला पाहिजे. खरे तर डॉक्टर चहा पिऊच नका असेच सांगतात. चहा पितानाच्या काही चुकांमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या सामान्य चुका शरीरासाठी घातक ठरतात. चहा पिताना कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घेवूयात.
या चूका टाळा
1 जास्त वेळ उकळवणे
जास्त वेळ उकळवलेला चहा प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.2 औषधांचा प्रयोग
काळी मिरी, सुंठ, तुळस, लवंग, जायफळ काहीजण चहामध्ये टाकतात. पण यातील कॅफेनमुळे या पदार्थांमधील गुणधर्म चहामध्ये योग्य प्रमाणात उतरत नाहीत.
3 रिकाम्या पोटी
रिकाम्यापोटी चहा प्यायल्यानेके अॅसिडिटी, कॅन्सरसारखे आजार जडण्याची शक्यता असते.
4 जेवणानंतर चहा
जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने जेवणातील पोषक घटक शरीरापर्यंत पोहचू शकत नाही
चहा पिताना ‘या’ 4 गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगले राखाल !
|