विशेष बातम्या
जर रोज केला अर्धातास व्यायाम तर लठ्ठपणा आणि डायबिटीजसह ‘या’ 7 आजारांपासून होईल रक्षण
By nisha patil -
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : सध्या आपली जीवनशैली अशी झाली आहे की, कुणीही व्यक्ती आजाराला बळी पडणे स्वाभाविक झाले आहे. जर तुम्हाला जीवनात आजाराला दूर ठेवायचे असेल आणि या आजारांपासून रक्षण करायचे असेल तर दररोज एक्सरसाइज करण्याच्या सवयीचा आपल्या रूटीनमध्ये समावेश करा. यामुळे अनेक इतर सुद्धा फायदे तुम्हाला होतात. एक्सरसाइजच्या त्या फायद्यांबाबत जाणून घेवूयात जे शरीराला होतात…
हे आहेत फायदे
1. ब्लड शुगर नियंत्रणात राहते. मेंदूला योग्यप्रमाणात ऑक्सीजन आणि रक्तपुरवठा होतो. स्मरणशक्ती वाढते.
2. ब्लड प्रेशर बर्यापैकी नियंत्रणात राहते. कार्डियो, योग किंवा एरोबिक्स यापैकी कोणतीही एक्सरसाइज करा.
3. इम्यूनिटी वाढते आणि आजार दूर राहतात.
4. मेटाबॉलिज्म सुधारते, बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी या समस्या दूर होतात. जास्त काळ तरूण राहू शकता.
5. वजन वेगाने कमी होते. यासाठी आहाराकडे सुद्धा लक्ष द्या. अवघ्या दोन महिन्यात 3 ते 4 किलोपर्यंत वजन कमी करूशकता.
6. तणाव आणि डिप्रेशनची समस्या दूर होते. योग आणि मेडिटेशनमुळे मेंदू शांत राहतो.
7. ब्लड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. गुड कोलेस्ट्रॉल वाढतात. हार्ट वेगाने ब्लड पम्प करते आणि जास्त प्रमाणात ऑक्सीजन घेता.
जर रोज केला अर्धातास व्यायाम तर लठ्ठपणा आणि डायबिटीजसह ‘या’ 7 आजारांपासून होईल रक्षणspeednewslive24#
|