बातम्या

चालत असताना करत असाल 'या' चुका तर होणार नाही फायदा

If you do these mistakes while walking


By nisha patil - 12/20/2023 7:24:57 AM
Share This News:



 पायी चालणं एक चांगली एक्सरसाइज आहे. जी तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. चालण्यात शरीराचे सगळे अवयव काम करत असतात. जसं एका कार्डियो वर्कआउटमध्ये होतं. पण हे करत असताना तुम्ही काही चुका करणं टाळलं पाहिजे. कारण या चुका तुमच्या मेहनतीवर पाणी फेरू शकतात.


बेटरहेल्थनुसार, जर तुम्ही दिवसातून 30 मिनिटे चालत असालतर याने तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. याने हार्ट अटॅकसहीत हृदयाच्या इतर आजारांचाही धोका कमी होतो. तसेच याने फुप्फुसांची क्षमताही वाढते आणि हाडेही मजबूत होतात.

हात न हलवण्याची चूक

चालत असताना हात हलवणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. पण काही लोक आपले हात स्थिर ठेवतात. या चुकीमुळे पायी चालण्याचे फायदे कमी होऊ शकतात. मुळात पायांसोबत हात मोठ्या मसल्सचे ग्रुप असतात. जे एकत्र काम केल्याने ब्लड सर्कुलेशन आणि हार्ट रेट चांगला होतो. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा एरोबिक एक्सरसाइजचे फायदे मिळतात.

स्पीडवर ठेवा लक्ष

चालताना तुम्हाला चालण्याच्या गतीवरही लक्ष दिलं पाहिजे. कारण फार जास्त हळू चालणं किंवा जास्त वेगाने चालण्यानेही फायदा कमी होऊ शकतो. तुमचा स्पीड असा असावा ज्यात तुम्ही न थकता जास्त वेळ चालू शकाल आणि शरीरावर सतत हलकं प्रेशर पडत रहावं.

वाकून किंवा टाइट होऊन चालणं

चालण्यादरम्यान तुमचं पोश्चर योग्य असणंही महत्वाचं आहे. तुमचं शरीर ना जास्त मागे असावं ना पुढच्या बाजूला असावं. तुमची छाती बाहेर आणि नजर समोर असली पाहिजे. तसेच शरीर टाइट करू नका.

पाणी कधी प्यावं?

पाणी प्यायल्याने शरीराचं टेम्प्रेचर एकदम खाली येतं. जर तुम्ही चालण्याच्या आधी किंवा नंतर थंड पाणी पित असाल तर हे चुकीचं ठरेल. जर तुम्हाला पाणी प्यायचं असेलच तर चालून झाल्यावर 15 मिनिटांनी प्यावं. सोबतच थंड पाणी न पिता साधं पाणी प्यावं तेही कमी.


चालत असताना करत असाल 'या' चुका तर होणार नाही फायदा