बातम्या

‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब! आवश्य करून पहा.

If you do this home remedy the cough will disappear Must try


By nisha patil - 11/3/2024 7:32:49 AM
Share This News:



 पावसाळ्यात कफ, खोकला असे त्रास सतत होत असतात. साधा खोकला झाला असताना अ‍ॅलोपॅथिक औषधे घेणे योग्य नसल्याने, गुणकारी आणि रामबाण घरगुती औषध घेणे कधीही चांगले ठरते. खोकला मुळापासून नष्ट करण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत ते जाणून घेवूयात.

हे उपाय करा

१) एक कप पाण्यात ४-५ लवंग टाकून उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर यात अर्धा लिंबू पिळा. नंतर एक चमचा मध टाकून घ्या.

२) मोहरीच्या तेलामध्ये ४-५ पाकळ्या लसूण टाकून गरम करा. झोपण्यापूर्वी या कोमट तेलाने पायाच्या तळव्यांवर, छातीवर मालिश करा.

३) तव्यावर तुरटी भाजून याची पावडर तयार करा. ती गुळासोबत नियमित सेवन करा.

४) एक कप पाण्यात अर्धा चमचा मुलेठी पावडर आणि ८-१० तुळशीची पाने टाकून उकळा. हे कोमट करण्याऐवजी चहाप्रमाणे घ्या.

५) जवस आणि तीळ समप्रमाणात मिसळून भाजून घ्या. याची पावडर बनवून सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यासोबत एक चमचा घ्या.

६) एक कप पाण्यात आल्याचा एक तुकडा, चिमूटभर दालचिनी आणि मिरे टाकून उकळवा. कोमट झाल्यावर गाळून मध मिसळून प्या.

७) लसणाच्या ३-४ पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधामध्ये टाकून उकळवा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्या.

८) एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून दररोज सकाळी उपाशीपोटी घ्या.


‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब! आवश्य करून पहा.