बातम्या
जर तुम्हाला मुंबई पोलिसांकडून फेसबूकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल, तर सावधान...
By nisha patil - 7/10/2023 5:03:06 PM
Share This News:
जर तुम्हाला मुंबई पोलिसांकडून फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल, तर सावधान, कारण पोलिसांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून पैसे मागितल्या प्रकरणी चौघांविरुद्ध वरळी पोलिसांकडून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलाचे उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून पैसे मागितल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चौघांनी मिळून एकूण दोन लाख 55 हजार रुपये लोकांकडून उकळल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.मुंबई वाहतूक पोलीस दलात कार्यरत सलेले भुजबळ यांच्या नावाने दोन बनवट प्रोफाईल तयार करण्यात आले होते. या प्रोफाईलद्वारे काही परिचीत व्यक्तींना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती. मग भुजबळ यांच्या नावाने आरोपींनी अनेकांकडून पैशांची मागणी केली. काहींकडून पैसेही उकळले. वरळी पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरळी पोलीस करत आहेत मात्र यापूर्वी सुद्धा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असे बनावट प्रोफाइल तयार करून पैशाची मागणी करण्यात आली होती. आरोपींना सुद्धा या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
जर तुम्हाला मुंबई पोलिसांकडून फेसबूकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल, तर सावधान...
|