बातम्या
झोपेची समस्या असेल तर हे पदार्थ देतील उत्तम झोप!
By nisha patil - 8/30/2023 7:56:02 AM
Share This News:
झोपेची समस्या असेल तर हे पदार्थ देतील उत्तम झोप!
किवी: नुकतीच एक चाचणी घेतली गेली ज्यात किवी झोप येण्यासाठी उत्तम आहे असं म्हटलं गेलंय. झोपण्याच्या एक तास आधी हे फळ खा. किवी मध्ये फोलेट (बी जीवनसत्व), सेरोटोनिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
यामुळे झोप चांगली येते.
कोमट दूध: झोपेच्या वेळी एक कप कोमट दूध प्या. याने खूप चांगली आणि गाढ झोप लागते. दूध हे एक पूर्ण अन्न आहे. आपले वडिलधारे आपल्याला नेहमी दूध प्यायचा सल्ला देत असतात. एकदा हा उपाय करून बघा, झोप कशी मस्त येईल!
भात: संशोधनात असे सांगितले गेले आहे की तांदळाचा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आपल्याला झोप येण्यासाठी उत्तम असतो. भात खाल्ला की दिवसासुद्धा डुलकी येते हो ना? मग रात्री झोपेची समस्या असेल तर भात खा.
बदाम: बदामात झोपेला प्रोत्साहन देणारे गुण आहेत. बदाम मॅग्नेशियमचा एक चांगला स्त्रोत आहे. एका अभ्यासानुसार, 10 दिवस दररोज बदाम खाल्ल्यानंतर निद्रानासशाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 14% घट झालीये. बदाम दुधात टाकून खाल्लं तर आणखी उत्तम.
केळी: केळीमध्ये सुमारे 375 मिलीग्राम पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, सेरोटोनिन असते. हे सगळे गुणधर्म असल्यामुळे केळी खाल्ली की चांगली झोप येऊ शकते. हे आरोग्यासाठी उत्तम आहे आणि झोप तर चांगली येतेच.
झोपेची समस्या असेल तर हे पदार्थ देतील उत्तम झोप!
|