बातम्या
सतत उचकी लागत असेल तर ट्राय करा हे आयुर्वेदिक उपाय, ताबडतोब थांबते उचकी
By nisha patil - 2/9/2023 8:30:11 AM
Share This News:
या गोष्टींनी थांबवू शकता उचकी
१. लिंबू –
हेल्थलाइनच्या एका बातमीनुसार, उचकी थांबवण्यासाठी लिंबू आणि मीठ वापरू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि मीठ काही वेळ तोंडात ठेवा. यामुळे उचकी लवकर थांबेल. उचकी थांबल्यानंतर तोंड स्वच्छ करा. कारण जास्त वेळ लिंबू रस तोंडात ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
२. चिंच –
चिंचेने सतत येणारी उचकी थांबू शकते. यासाठी सर्वप्रथम चिंच तोंडात ठेवा. यानंतर ती चोखत रहा. शक्य असल्यास चिंचे पाणी प्या. यामुळे लवकरच आराम मिळेल.
३. आले –
आल्याच्या सेवनाने सतत येणारी उचकी थांबवता येते. यासाठी आल्याचे काही तुकडे करा आणि तोंडात ठेवून चोखत राहा. यामुळे त्वरित आराम मिळेल.
४. ब्लॅकबेरी –
ब्लॅकबेरी एक सायट्रस फ्रूट आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असते.
उचकी येत असेल तर ब्लॅकबेरी खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे उचकी पासून लगेच आराम मिळेल.
५. जायफळ –
जायफळ हा मसाला आहे. पण उचकी थांबवण्यासाठी याचा वापर करू शकता. जायफळचा तुकडा तोंडात ठेवून चोखा किंवा त्याचे पाणी प्या.
सतत उचकी लागत असेल तर ट्राय करा हे आयुर्वेदिक उपाय, ताबडतोब थांबते उचकी
|