बातम्या
‘दुधा’चा असा उपयोग केल्यास होतील ‘फायदे’च फायदे
By nisha patil - 3/23/2024 10:05:03 AM
Share This News:
मानसिक, शारीरिक, तसेच आध्यात्मिक शक्ती वाढविणारा गायीच्या दुधासारखा दुसरा आहार नाही. नियमित दूध सेवन केल्यास शरीर निरोगी राहते. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींनी दुधाचे सेवन केले पाहिजे. दुध अनेक औषधांसोबत घेतले जाते. त्यामुळे औषधांचा चांगला परिणाम दिसून येतो. दुधात सुंठ घासून त्याचा कपाळावर लेप लावल्यास डोकेदुखी कमी होते.
गाईच्या दुधातील सेरीब्रोसाइड्स तत्व मेंदू व बुद्धीच्या विकासात साहाय्यक असते. डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते. आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा गार दुध एकेक घोट पीत त्यासोबत पाणी प्यावे. दुध स्वाभाविकपणे गार केलेले असावे. रक्तपित्त म्हणजेच शरीरात निष्कारण कुठूनही रक्तस्त्राव होत असल्यास कच्च्या दुधात २ ग्रॅम गोखुर चूर्ण किंवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून पिल्याने लाभ होतो.
बद्धकोष्ठ म्हणजेच मलावरोधाचा त्रास असल्यास गरम दुधासोबत गुलकंद घेतल्याने मलावरोध तसेच मूळव्याधीत लाभ होतो. आतड्यांचा कुठलाही आजार असल्यास जेवणापूर्वी एक चमचा कोमाट दुध घेऊन हळूहळू पोट आणि नाभीवर मालिश करावी. एकतास विश्रांती घेऊन मग जेवण करावे. जेवणानंतर लगेच लघुशंका केल्याने आतड्यांना येणारी सूज आणि इतर आजारही दूर होतात तसेच आतडे मजबूत बनतात.
धष्टपुष्ट, सुंदर आणि सुडौल शरीर, कुशाग्र बुद्धीसाठी मुलांना नियमित देशी गाईचे दुध व लोणी खाऊ घालावे. गाईचे दुध पृथ्वीवरील साक्षात अमृत आहे. हे सर्वोत्तम पेय तसेच खाद्यपदार्थांमध्ये संपूर्ण व सर्वश्रेष्ठ आहाराबरोबरच मौल्यवान औषधही आहे
‘दुधा’चा असा उपयोग केल्यास होतील ‘फायदे’च फायदे
|