बातम्या

स्वस्थ हृदय हवं असेल तर आजपासूनच या पदार्थांचे सेवन करा सुरू

If you want a healthy heart


By nisha patil - 7/27/2023 7:38:22 AM
Share This News:



खराब आहारपद्धती आणि लाइफस्टाइलयामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्याचे नुकसान होताना दिसते. स्ट्रोक आणि हार्ट ॲटॅक सारख्या आजारांचा धोका आता फक्त वृद्धांनाच नव्हे तर तरूण वयातील व्यक्ती, तसेच लहान मुलांनाही आहे. हृदय स्वस्थ राखण्यासाठी वर्कआऊटसोबतच डाएटचीही त्यात प्रमुख भूमिका असते. हेल्दी डाएट घेतल्याने शरीर तर मजबूत होतेच पण त्यासोबतच रोगांशी अथवा आजारांशी लढण्याची शक्तीही मिळते.एका संशोधनानुसार, जे लोक हेल्दी डाएट फॉलो करतात, त्यांना हृदयविकाराच्या आजारांचा धोका 31 टक्के कमी असतो. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते जाणून घेऊया.

अक्रोडअक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे आपल्या शरीराचे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते. रोज अक्रोड खाल्ल्याने धमन्यांना येणारी सूज कमी होऊ शकते. तसेच अक्रोडातील हेल्दी फॅट्समुळे हृदयही स्वस्थ राहते.

संत्रं

हाय ब्लड प्रेशर हे देखील हृदयविकाराचे एक लक्षण असू शकते. हाय बीपीचा त्रास असेल तर संत्र्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त पेक्टिन फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते. हे नियमित खाल्ल्याने हाय बीपीची समस्या देखील दूर होऊ शकते.

अळशी

अळशीमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. अळशीचा डाएटमध्ये समावेश केल्यास ब्लड फ्लो उत्तम राहतो. शरीरातील फायबर आणि फायटोकेमिकल्सची कमतरता पूर्ण करणारी ही अळशी भाजून किंवा इतर पदार्थांता घालून सेवन करता येऊ शकते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. शिवाय त्यामध्ये नायट्रेटही आढळते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी पालक, बीन्स, मोहरी आणि मेथी या भाज्यांचा आहारात समावेश करावा. हे खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर होते


स्वस्थ हृदय हवं असेल तर आजपासूनच या पदार्थांचे सेवन करा सुरू