बातम्या

गोरी, नितळ, निरोगी त्वचा हवी, मग हे जरूर वाचा

If you want fair smooth


By nisha patil - 2/14/2024 7:46:50 AM
Share This News:



त्वचा गोरी करण्यासाठी अनेक उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. ही उत्पादनं विकणारे अनेक दावे करतात. काहीजण म्हणतात आठवडाभरात रंग गोरा होईल. तर काही कंपन्या म्हणतात, पंधरा दिवसात निखळ, गोरी, सुंदर त्वचा आमच्या उत्पादनाच्या वापराने मिळू शकते. हे दावे किती खरे हे ग्राहकांना चांगलेच ठाऊक आहे. गोरी, नितळ, निरोगी त्वचा हवी असेल तर केमिकलयुक्त क्रिम्स वापरण्यापेक्षा काही घरगुती पद्धतीने ते शक्य आहे. यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

नियमित टोमॅटोचं सेवन करणं त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे कारण यात व्हिटॅमिन सी आणि लिकोपिन हा घटक असतो. दररोज बिटाचं रस प्यायल्यास शरीराला आवश्यक आयर्न मिळतं, ज्यामुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळत. यामुळे त्वचा चमकदार होते. बिटाचा रस चेहऱ्यावरही लावू शकता. हिरव्या पालेभाज्यांमधील फायबर शरीरातील अशुद्धता दूर करतं त्यामुळे आपोआपच तुमची त्वचा आतून निरोगी राहते. अशा भाज्यांचं नियमित सेवन करणं हे पूर्ण आरोग्यासाठी चांगलं आहे.

पपईतील व्हिटॅमिन ए, सी आणि ई यासारखे अँटिऑक्सिडंट त्वचा तरुण ठेवण्यास ममदत करतं. पपईमुळे त्वचेचा असमान पोतही दूर होतो. त्वचेसाठी आवश्यक असलेलं व्हिटॅमिन सी किवीमध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि उजळण्यासाठी किवी खा किंवा त्याचा गर चेहऱ्यावर लावा. स्टड्ढॉबेरीजमध्येही व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे तुम्हाला हवं असलेलं सौंदर्य मिळतं.


गाजरमधील व्हिटॅमिन सी आणि बिटा केरोटिन त्वचा निरोगी आणि उजळ बनवतं. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असतं जे पेशींचं संरक्षण करतं. त्वेचवर परिणाम करणाऱ्या फ्री रेडिकल डॅमेजपासून संरक्षण देतं.


गोरी, नितळ, निरोगी त्वचा हवी, मग हे जरूर वाचा