बातम्या
दीर्घतारूण्य हवे असेल तर ‘हे’ आवश्य खा, वार्धक्य लवकर येणार नाही
By nisha patil - 2/23/2024 8:46:49 AM
Share This News:
काही पदार्थ असे असतात, जे खाल्ल्याने तुमच्या तारूण्याचा कालावधी वाढू शकतो. हे पदार्थ कोणते याची माहिती करून घेतल्यास तारूण्य टिकवणे आणि वाढवणे सोपे जाऊ शकते. सुकामेवा यासाठी लाभदायक असून यातील आक्रोड हा सर्वाधिक गुणकारी आहे. अक्रोड प्रकृतीसाठी उत्तम असून अनेक आजारांवरही रामबाण उपाय आहे. दोन महिने नियमितपणे किमान एक अक्रोड जरी खाल्ले तरी आरोग्यात सुधारणा दिसून येते.
हे आहेत फायदे
* तारुण्य टिकवते. वार्धक्याला दूर ठेवते.
* संधिवाताला आटोक्यात ठेवणे, मेंदू तल्लख ठेवणे.
* आतड्यांवर सकारात्मक परिणाम होतो.
* विविध आजारांना रोखण्यासाठी मदत होते.
* योग्यप्रमाणात खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते.
* शरीरात चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. आरोग्याला मदत होते.
* दृदयविकार, कॅन्सर आणि डिमेन्शियासारखे घातक आजार दूर राहतात.
दीर्घतारूण्य हवे असेल तर ‘हे’ आवश्य खा, वार्धक्य लवकर येणार नाही
|