बातम्या

बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून मुक्त व्हायचे असेल तर या ड्रायफ्रुट्सचे सेवन ठरेल गुणकारी

If you want to get rid of the problem of constipation


By nisha patil - 9/16/2023 7:42:02 AM
Share This News:



ड्रायफ्रुट्समध्ये  अनेक पोषक तत्वं आणि अँटी-ऑक्सीडंट्स असतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या सेवनामुळे इम्युनिटी बूस्ट होते तसेच फ्री- रॅडिकल्स मुळे होणाऱ्या नुकसानापासूनही संरक्षण करण्यास ड्रायफ्रुट्स सक्षम असतात.

पण ड्रायफ्रुट्स हे बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका करण्यासही मदत करतात हे तुम्हाला माहीत आहे का ? आजकाल बहुतांश लोकांना बद्धकोष्ठतेचा (constipation problem) त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या वेळा न पाळणे, अनहेल्दी पदार्थ खाणे यामुळे बऱ्याच लोकांना अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. यामुळे अस्वस्थ वाटू लागते. अशा वेळी आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. हे ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून मुक्तता मिळण्यास मदत होते.

ड्राय प्लम

प्लमला आलूबुखारा असेही म्हटले जाते. ते बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ड्राय प्लमचाही समावेश करू शकता.

सुके अंजीरही फायदेशीर

बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही सुके अंजीरही खाऊ शकता. त्यामध्ये डायटरी फायबर असते. तसेच त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, झिंक, लोह आणि मॅग्नेशिअम सारखी पोषक तत्वं असतात. सुके अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसोबतच इतरही अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.

सुके ॲप्रीकॉट्स

तुम्ही सुके ॲप्रीकॉट्सही खाऊ शकता. त्यामध्ये फायबर भरपूर असते. तसेच त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. सुक्या ॲप्रीकॉट्स मध्ये लोहासारखी पोषक तत्वंदेखील असतात. सुके ॲप्रीकॉट्स खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळेलच. पण ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी देखील त्याचे सेवन फायदेशीर ठरते. तसेच त्यांच्या सेवनाने रक्ताची कमतरता देखील दूर होते.

खजूर

खजूर खूपच चविष्ट असतो. खजूराचा उपयोग करून तुम्ही अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता. विशेषत: खजुराचे लाडू हे अतिशय चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही खजूराचे सेवनही करू शकता.

काळ्या मनुका

काळ्या मनुकांचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. तुम्ही काळ्या मनुका पाण्यात भिजवूनही खाऊ शकता. त्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काळ्या मनुकांचे सेवन अत्युत्तम ठरते. त्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. काळ्या मनुका खाणे हे केसांसाठीही खूप चांगले व फायदेशीर असते.


बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून मुक्त व्हायचे असेल तर या ड्रायफ्रुट्सचे सेवन ठरेल गुणकारी