बातम्या
दात चांगले ठेवायचे असेल तर असे करणे टाळा...
By nisha patil - 7/21/2023 7:41:04 AM
Share This News:
पांढरे शुभ्र आणि स्वच्छ चमकदार दात हवे असे सगळ्यांना वाटत असतं. चांगले दात चांगल्या आरोग्याचे सूचक असतात. आपल्याला सौंदर्यामध्ये भर पडतात. चांगले दात व्यक्तिमत्त्वाला आकर्षक करते. पण हे दातच चांगले नसतील तर काय? चांगला चेहरा असेल आणि दात चांगले नसतील तर लोक नाव ठेवतात. लहानपणी तर किडलेले आणि खराब दात आपोआपच पडून जातात. पण मोठे झाल्यावर असे होत नाही. चांगले आणि स्वच्छ दात ठेवण्यासाठी हे करणे टाळावे...
* अती थंड वस्तूंचे सेवन करणे - चांगल्या दातांसाठी अती थंड वस्तूंचे सेवन करणे टाळावे. थंड वस्तूंचे सेवन केल्याने दाताला इजा होण्याची शक्यता असते आणि दात खराब होऊ शकतात.
* दातांचा साह्याने रॅपर खोलणे - बऱ्याचशा लोकांची सवय असते दाताने रॅपर फाडतात किंवा बाटलीचे झाकण उघडतात. असे करू नये. असे केल्याने दात कमजोर होतात आणि दात त्यांची चमक जाते. * दातांची मसाज करणे - काही लोक जोरा जोरात दात घासतात आणि बराच वेळापर्यंत घासतात, असे करू नये. ह्यामुळे हिरड्यांना इजा होते. दात लवकर खराब होतात.* दाताने पेन- पेन्सिल चावणे - काही लोक आणि खास करून लहान मुलं त्यांना सवय असते दाताने पेन किंवा पेन्सिल चावतात, असे केल्याने दाताला इजा होते आणि दात कमजोर होतात.
* दात घासण्याचा कंटाळा करणे - लहान मुलं दात घासण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे दात किडतात आणि लवकर खराब होतात. बरेच मोठी माणसं देखील दात घासत नाही त्यामुळे त्यांचा तोंडाला उग्र वास येतो आणि दात खराब होतात.
दात चांगले ठेवायचे असेल तर असे करणे टाळा...
|