बातम्या

आहारातून मीठ कमी करायचे असेल तर हे उपाय ठरतील फायदेशीर

If you want to reduce salt in your diet


By nisha patil - 6/30/2023 7:33:47 AM
Share This News:



मीठाचा  वापर केल्याने जेवणाची चव तर वाढवतोच, पण शरीरातील मज्जातंतू आणि स्नायूंचे कार्य तसेच पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते.

मात्र,
मीठाच्या
अतिरिक्त सेवनामुळे शरीराचे खूप नुकसान होते. दररोज जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात, कॅल्शिअमची कमतरता अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करणे फार महत्वाचे आहे. तुम्हालाही तुमच्या शरीरातील मीठाचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुम्ही यासाठी काही प्रभावी उपाय करू शकता

पॅकेज्ड पदार्थांपासून दूर रहा

जर तुम्हाला तुमच्या आहारातील मीठाचे प्रमाण कमी करायचे असेल, तर पॅकबंद पदार्थांपासून दूर राहणे उत्तम. बहुतेक वेळा कॅन केलेल्या पदार्थांमध्ये मीठ जास्त वापरले जाते, कारण ते संरक्षक म्हणून देखील कार्य करते. म्हणूनच पॅकबंद पदार्थांपासून दूर राहिल्यास तुमच्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी होऊ शकते.

टेबल सॉल्टचा वापर टाळा

जेव्हा तुम्ही जेवत असाल तेव्हा अन्नामध्ये वरतून मीठ घालू नका. अन्न शिजवताना नेहमी मर्यादित प्रमाणात मीठ वापरा, जेणेकरून तुम्हाला नंतर वरून मीठ वापरावे लागणार नाही. जेवणात वरतून मीठ घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

सीफूड खाणे टाळा

तुमच्या आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही जास्तीचे सोडिअम टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्त सोडिअम टाळण्यासाठी खाऱ्या पाण्यातील मासे आणि सीफूडपासून शक्यतो दूर रहा.

ताजी फळे आणि भाज्या खा

निरोगी राहण्यासाठी, सुपरमार्केटमधील कॅन केलेले व गोठवलेले पदार्थ खाणे टाळा. मुख्यतः ताजी फळे आणि भाज्या खरेदी करण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करा.

ऑर्डर देण्याऐवजी स्वतः अन्न शिजवा

बाहेरून मागवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मीठाचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे मीठाचा अतिरेक टाळायचा असेल, तर ऑर्डर करण्याऐवजी घरीच स्वयंपाक करावा.

लेबल तपासा

तुम्ही पॅकेज केलेले अन्न खरेदी करत असाल तर नेहमी लेबल तपासावे. पॅकबंद केलेले खाद्यपदार्थ खरेदी करताना, त्यात सोडिअमचे प्रमाण कमी आहे याची खात्री करून घ्या.

मसाले आणि सिझनिंग वापरा

जर तुम्हाला तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण कमी करायचे असेल तर मसाले आणि सिझनिंग वापरा. यासाठी तुम्ही लसूण-कांदा मसाला, जिरं, आलं, काळी मिरी, धणे, जायफळ, कोरडी मोहरी, सेलेरी पाने, लिंबाचा रस, आमचूर इत्यादी मसाल्यांचा वापर करू शकता.


आहारातून मीठ कमी करायचे असेल तर हे उपाय ठरतील फायदेशीर