बातम्या

मेकअप काढायचा असेल तर केमीकल न वापरता या गोष्टींचा करा उपयोग

If you want to remove makeup


By nisha patil - 4/12/2023 9:38:20 AM
Share This News:



सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. लग्न म्हटलं की मेकअप आलाच. लग्नसमारंभात स्त्रिया आवर्जून मेकअप करत असतात. पण थोड्यावेळासाठी केलेला हा मेकअप स्त्रियांच्या चेहऱ्यासाठी हानिकार ठरू शकतो.

त्यात महिला लग्नसमारंभामध्ये आपल्या चेहऱ्यावरी डाग, डार्क सर्कल्स लपवण्यासाठी कन्सीलर, फाऊंडेशनचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यात बहुतेक महिला स्वस्त मेकअप उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. पण हेच स्वस्त असलेले आणि बनावट प्रोडक्ट्स आपल्या चेहऱ्याला हानी पोहचवण्याचं काम करतात.

आजकाल मेकअप प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो. हे केमिकलयुक्त प्रोडक्टस आपल्या स्किनला हानी पोहचवण्याचं काम करतात. मग आपल्या चेहऱ्यावर, डाग, पिंपल्स अशा समस्या निर्माण होताना दिसतात. त्यात आपण मेकअप लावणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच मेकअप काढणं देखील महत्त्वाचं असतं. बहुतेक महिला मेकअप नीट काढत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर तो तसाच राहून जातो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स सारख्या समस्या निर्माण होतात. तर काही महीला कमिकलयुक्त मेकअप रिमूव्हलने मेकअप रिमूव्ह करत असतात.

नारळ तेल – नारळाच्या तेलापासून तुम्ही मेकअप रिमूव्हल बनवू शकता. यासाठी नारळाचं तेल घ्या आणि त्यामध्ये गव्हाचा कोंडा, लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब मिक्स करा. नंतर हे तयार झालेले मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. काही मिनिटांनंतर तुमचा चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमचा मेकअप रिमूव्ह होईल.

ओट्स आणि दही – दही आणि ओट्सपासून तुम्ही रिमूव्हल बनवू शकता. यासाठी दही घ्या आणि त्यामध्ये बदाम पावडर, ओट्स मिक्स करा. तयार झालेली पेस्ट तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि नीट मसाज करा. त्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमचा मेकअप सहज रिमूव्ह होईल.


मेकअप काढायचा असेल तर केमीकल न वापरता या गोष्टींचा करा उपयोग