बातम्या

जलकुंभाच्या भगदाडाकडे कुंभोज ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Ignorance of the Kumbhoj Gram Panchayat towards the overflowing of the Jalakumbha


By nisha patil - 6/13/2023 4:52:42 PM
Share This News:



हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये असणाऱ्या जलकुंभ संरक्षक भिंतीला मोठे भागदाड पडले असून गेल्या एक वर्षापासून या भगदाडाकडे ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे.

परिणामी सदर संरक्षक भिंतीला भगदाड पडल्याने अनेक जनावरे सदर भगदाडातून आत पाणी जलकुंभ परिसरात वावरत असून, अनेक नागरिक या भगदाडाचा गैरवापर करत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे.  ग्रामपंचायत कुंभोज यांनी सदर भगत तात्काळ मोजून घेण्याची मागणी कुंभोज ग्रामस्थ त्यातून व्यक्त होत असून. सदर मागणीकडे ग्रामपंचायत कुंभोज लक्ष देणार का याची चर्चा चौकात चौकात रंगत आहे तारा न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे


जलकुंभाच्या भगदाडाकडे कुंभोज ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष