बातम्या
बेकायदेशीर गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त.एकास अटक
By nisha patil - 4/11/2024 1:38:19 PM
Share This News:
चंदगड तालुक्यातील पारले इथं गोवा बनावटीच्या बेकायदेशीर मद्य साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. याप्रकरणी पार्ले येथील शिवाजी धाकलू गावडे याला ताब्यात घेतलंय.त्याच्याकडून 7 लाख 40 हजार 880 रुपये किमतीचा मद्य साठा जप्त करण्यात आलाय.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलीय.
चंदगड तालुक्यातील पार्ले येथे बेकायदेशीर साठा केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली होती.त्यानुसार ही कारवाई करण्यात आलीय.दरम्यान महाराष्ट्र राज्याचा कर चुकवण्यासाठी गोवा बनावटीच्या मद्याचा साठा केल्याची कबुली आरोपी शिवाजी गावडे दिलीय.ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, समीर कांबळे, राजू कांबळे, सतीश जंगम, प्रकाश पाटील, दीपक घोरपडे,सागर चौगुले, सुशील पाटील यांनी मिळून ही कारवाई केलीय.
बेकायदेशीर गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त.एकास अटक
|