बातम्या

कोल्हापुरात अवैध अफू व गांजा विक्रीचे रॅकेट ताब्यात

Illegal opium and ganja racket seized in Kolhapur


By nisha patil - 3/20/2024 7:06:09 PM
Share This News:



लोकसभा निवडणुकीचे दरम्यान अवैध व्यवसायास आळा घालणेसाठी  अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे व अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करणेचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गोपनीय बातमीदार मार्फत बातमी घेऊन  पेठ वडगांव पोलीस ठाणे हद्दीत हॉटेल जंम्भेश्वराय हायवे या हॉटेलचे पाठीमागील बाजूस लागून असलेले चार खोल्यांपैकी एका खोलीमध्ये अफू बोंडांचा साठा करून त्याची पावडर तयार करतात. तसेच गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्या बाबतची खात्रीशीर बातमी मिळाली

 स्थानिक गुन्हे अन्वेषण  पथकाने मंगळवारी सायंकाळी  छापा टाकला असता मनिष मोहनराम, मोहन चोकलू चव्हाण, अमिर सय्यद जमादार,यांच्या ताब्यातून .  40 किलो 4 ग्रॅम वजनाचा अफू, 1 किलो 195 ग्रॅम वजनाची बारीक पावडर व 01 किलो गांजा असा एकूण 5,21,400/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . मिळून आलेल्या मुद्देमालासह रितसर कायदेशीर प्रक्रिया करून  तिघांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द पेठवडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक,. महेंद्र पंडित सो, अपर पोलीस अधीक्षक, . निकेश खोटमोडे-पाटील सो, जयश्री देसाई सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहा. फौजदार विजय गुरखे,  पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास किरोळकर, नामदेव यादव, सचिन देसाई,  महेश गवळी,  अमित सर्जे,  सागर चौगुले,  प्रविण पाटील, विनोद कांबळे, चालक- ग्रेड पोसई महादेव कुहाडे, व चालक सुशिल पाटील यांनी केली आहे.


कोल्हापुरात अवैध अफू व गांजा विक्रीचे रॅकेट ताब्यात