बातम्या
लक्ष्मीपूरी ठाण्याचे निष्क्रिय पोलीस निरीक्षक यांना तातडीने निलंबीत करा
By nisha patil - 11/12/2023 7:43:54 PM
Share This News:
लक्ष्मीपूरी ठाण्याचे निष्क्रिय पोलीस निरीक्षक यांना तातडीने निलंबीत करा
दोन दिवसांपूर्वी शनिवार पेठ कोल्हापूर येथे माजी आमदार क्षीरसागर व त्यांच्या टोळक्याने एका सर्वसामान्य व्यक्तीच्या घरामध्ये घुसून दहशत माजवून मारहाण केल्याचे व्हिडीओज् सर्वत्र व्हायरल झाले आहेत, त्याच कुटूंबातील एका भयभीत व्यक्तीने धाडसाने आपल्याला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळेल या आपेक्षेने लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. परंतु नेहमी प्रमाणे चौकशी करून कारवाई करतो हे आश्वासन देऊन संबंधीतांना परत पाठवले. राजकीय दबावाखाली जर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काम करणार असतील आणि सर्व सामान्य नागरीकांना न्याय देण्यास असमर्थ असतील तरत्यांना ताबडतोब निलंबीत करावे.
कोणी दहशत माजवली, कशासाठी मारहाण केली हे सर्व व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे, तरी पण कसली चौकशी करताय? त्या कुटुंबातील लोकांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना न्याय मिळणार काय? हे जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्पष्ट करावे.
कायद्याचे राज्य आहे हे म्हणणाच्या गृहमंत्री व मुख्यमंत्र्यानी या गंभीर प्रकारामध्ये लक्ष घालावे व अशी कायमच दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तीच्या माजी लोकप्रतिनीधीला दिलेले पद ताबडतोब काढून घ्यावे व या गंभीर प्रकारामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, यापूर्वी सुध्दा वरीष्ठ महिला पोलीस अधिका-यांच्या बाबतीत काय घडले हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे, एका मागासवर्गीय बांधवाला याच माजी लोकप्रतिनीधीने मारहाण करताना सर्वांनी पाहिले आहे,
अशा अनेक घटना घडून सुध्दा हि व्यक्ती जर मोकाट सुटणार असेल तर भविष्यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाऱ्याचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )गटाचे वतीने जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित याना दिला
यावेळी संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, राहुल माळी, राजेंद्र पाटील, दत्ताजी टिपूगडे, सुहास डोंगरे, दिपाली शिंदे, दिलीप देसाई, दिनेश साळोखे, अभिजीत पाटील, महेश उत्तुरे, संजय जाधव, शशिकांत बिडकर, विराज ओतारी, स्वरूप मांगले, विवेक काटकर, अभिजीत ओतारी, राजू सांगावकर,धनाजी यादव, विकी मोहिते, विनय क्षीरसागर, विजय नाईक, रुपेश रोडे,उपस्थित होते
लक्ष्मीपूरी ठाण्याचे निष्क्रिय पोलीस निरीक्षक यांना तातडीने निलंबीत करा
|