विशेष बातम्या

व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे

Importance and benefits of exercise in life


By nisha patil - 6/13/2023 8:41:15 AM
Share This News:



निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे तरी काढायलाच हवीत. यासाठीच जाणून घ्या व्यायामाचे महत्त्व आणि फायदे 
आजकाल वाढते वजन ही प्रत्येकासाठी एक डोकेदुखी ठरत आहे. मात्र जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होते. व्यायामामुळे तुमचे वजन कमी होतेच शिवाय तुम्ही निरोगीदेखील राहता. कारण व्यायामासाठी तुम्हाला सतत शारीरिक हालचाल करावी लागते. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल करता तेव्हा तुमच्या शरीरातील कॅलरिज बर्न होतात. ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो आणि वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जावून तज्ञ्जांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व्यायामाचे प्रकार शिकून घ्यायला हवेत. जर तुमचे वजन नियंत्रणात राहवे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चालण्याचा व्यायामदेखील नियमित करू शकता. ह्रदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो
नियमित व्यायाम करणे ह्रदयाच्या आरोग्यासाठी हितकारक असते. कारण अयोग्य जीवनशैली आणि चुकीचा आहार याचे प्रमाण वाढलेले आहे. ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची निर्मिती वाढून ह्रदयाचे आरोग्य बिघडताना दिसून येते. मात्र व्यायाम केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही. ज्याचा चांगला परिणाम ह्रदयाच्या आरोग्यावर होतो आणि तुमचे ह्रदय मजबूत राहते. ह्रदयाच्या आरोग्यासाठी योग्य पद्धतीने कार्डिओ व्यायाम प्रकार करायला हवेत.

मानसिक आरोग्य आणि मूड सुधारतो
शरीराप्रमाणेच मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक शारीरिक स्थितीचा मनावर आणि मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होत असतो. कामाची चिंता अथवा नातेसंबधांमधील ताणतणावामुळे नैराश्य आले असेल तर तुम्हाला नियमित व्यायामाची गरज आहे. कारण व्यायामामुळे तुमचा मेंदू कार्यरत राहतो आणि तुमच्या भावना आणि मनावर चांगला परिणाम होतो. मनावरील ताण दूर करण्यासाठी तुम्ही योगासने, प्राणायम, मेडिटेशनचा सराव करू शकता. 

हाडे आणि स्नायू  मजबूत बळकट होतात
व्यायामामुळे तुमची हाडे मजबूत आणि स्नायू बळकट होतात. वेटलिफ्टिंग सारख्या व्यायामप्रकारामुळे तुमच्या हाडे आणि स्नायूंवर चांगला ताण येतो. वयोमानानुसार शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. यासाठी उतरत्या काळातही हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील बोन डेन्सिटी वाढते. ज्यामुळे तुम्ही कायम तरूण आणि उत्साही दिसता. खेळाडूंना हाडे मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे असते. झोप चांगली लागते
आजकाल जास्त उशीरा काम करणे, रात्री उशीरा झोपणे, रात्री उशीरापर्यंत टीव्ही अथवा मोबाईल पाहणे, उशीरा जेवणे यामुळे झोपेचे चक्र बिघडते. अनेकांना रात्री झोप न लागणे अथवा झोपमोड होण्याचा त्रास जाणवतो. मात्र जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्या झोपेवर कोणताही परिणाम होत नाही. व्यायामामुळे तुम्हाला चांगला आराम मिळतो आणि शांत झोप लागते.शारीरिक ऊर्जा वाढते
कामाचा वेग आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्ही सतत उत्साही असणे गरजेचं आहे. मात्र दैनंदिन कामाची चिंता, घरच्या जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यामुळे तुमची शारीरिक ऊर्जा कमी होते आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि शरीरावर होतो. यासाठीच नियमित व्यायाम करा ज्यामुळे तुम्ही सतत उत्साही राहाल. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील ऑस्किजनची पातळी वाढते. शरीरातील प्रत्येक अवयवाला पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यामुळे तुमचा कामाचा उत्साह वाढतो. 

मेंदूचे कार्य आणि स्मरणशक्ती सुधारते
मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे. कारण व्यायामामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके नियंत्रित राहतात, तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ऑक्सिजनची पातळी वाढते. ज्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि तुमची विचारशक्ती, स्मरणशक्ती, निर्णय शक्ती, आकलन शक्ती वाढू लागते.


व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे